यड्राव च्या सरपंच पदी कुणाल​सिंह नाईक-निंबाळकर तर उपसरपंचपदी प्राची हिंगे यांची निवड



 हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले              


शिरोळ तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्jया​ यड्राव ग्रामपंचायत सरपंचपदी​ सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर व​ डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या​ महा विकास आघाडीचे कुणाल​ सिंह नाईक निंबाळकर यांची सरपंच पदी तर सौ प्राची​ प्रदीप हिंगे यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​यड्राव सरपंच पदाच्या झालेल्या​ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून कुणाल​ सिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर उपसरपंच​ पदासाठी सौ प्राची प्रदीप हिंगे​ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता सर्व विरोधी भाजप  च्या श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीकडून सरपंच पदासाठी प्रदीप पाटील व उपसरपंच पदासाठी सौ राधिका तास गावे यांचा उमेदवारी दाखल करण्यात आला होता गुप्त पद्धतीने घेण्यात आलेला मतदानामध्ये महा विकास आघाडीला 9 मते तर विरोधी भाजप  च्या श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास  आघाडीला आठ मते पडली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसो टोणे यांनी सरपंच पदी कुणाल 

सिह नाईक निंबाळकर व उपसरपंच पदी प्राची हिंगे यांची निवड झाल्याची घोषणा केली त्यामुळे या देशाच्या इतिहासात सर्वात तरूण सरपंच होण्याचा मान​ कुणालसिंह  नाईक-निंबाळकर यांना मिळाला यावेळी तलाठी नितीन कांबळे हरोली​ चे ग्राम विकास अधिकारी स्मिता शेळके त्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडली.​ तर शहापूर पोलीस ठाणे कडून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

--

Post a Comment

Previous Post Next Post