पुणे जिल्ह्यात स्वच्छतागृह बांधण्यासाठी उपलब्ध निधी तात्काळ खर्च करण्याची डॉ.नीलम गोऱ्हे यांची पुणे जिल्हा वार्षिक बैठकीत सूचना



पुणे दि.१२ : पुणे विभागाच्या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक बैठक आज विधानभवन पुणे येथे संपन्न झाली. सदरील बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी उपसभापती विधानपरिषद ना.डॉ.नीलम गोऱ्हे, वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. 

यावेळी ना.डॉ.गोऱ्हे यांनी अर्थमंत्री यांचे लक्ष वेधताना खालील विषयावर,  मुद्यावर निवेदन दिले, यात 

● महाराष्ट्र राज्याचे बजेट मार्चमध्ये सादर करत आहेत. त्यामुळे आम्ही अपेक्षा ठेवतो की जेंडर responsive बजेट म्हणजे महिला आणि सामाजिक दृष्ट्या अति आवश्यक घटकात मोडतात अशा घटकांना केंद्रीभूत ठेवून हा अर्थसंकल्प आपण सादर कराल अशी अपेक्षा ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी काही पावले उचलली आहेत. परंतु त्याला अधिक ठोस रूप देणे आवश्यक आहे. जेंडर responsive बजेट याचा अर्थ स्त्रियांच्या हिताला चालना देणारी धोरणे सर्वच विभागांच्याकडून प्रत्यक्षात आणली जावीत अशीही  त्यांच्यातील अपेक्षा असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. 

● निर्भया फंड राज्यसरकारला किती मिळालेला आहे?  अखर्चित किती राहिला आहे? आणि अजून किती मिळू शकतो यावर माहिती मिळण्याबाबत अपेक्षा ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात व्यक्त केली. 

● हडपसर आणि धायरी फाटा येथे परिसरात मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे औंध शासकीय हॉस्पिटलप्रमाणे  शासकीय हाँस्पीटल  तसेच अपघात हॉस्पिटल हडपसर आणि धायरी फाटा क्षेत्रात देखील सुरू करण्याबाबत उभारण्यासाठी तरतुद करण्याबाबत देखील निवदेनात डॉ.गोऱ्हे यांनी मांडल्या आहेत.

● राज्य महामार्ग येथे शौचालय संख्या खूप कमी आहे काही ठिकाणी तर काही उपलब्ध नाही. पेट्रोल पंपावर शौचालय उपलब्ध असे वारंवार सांगितले जाते परंतु मी पाहिले आहे की तर अनुभवले सुद्धा आहे त्यात शौचालयाच्या ठिकाणी पाणी नाही, तर कुठे खूप मोडकळीस आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महामार्गावर शासनाच्या वतीने शौचालये  उभारण्याबाबत प्रस्ताव तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबविण्याबाबत विचार करण्यात यावा असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. स्वच्छतागृहसाठी पुणे जिल्हापरिषद कडे १०५ कोटी निधी उपलब्ध असून जागा मिळत स्वच्छतागृह बांधण्यात आले नसल्याचे   जिल्हा परिषद मुख्याधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले. यात डॉ.गोऱ्हे यांनी ग्रामपंचायत तसेच स्थानिक आमदारांना विचारणा करण्याची सूचना केली तर उपस्थितीत आमदारांनी स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले याबद्दल डॉ.गोऱ्हे आभार मानले व लवकरच यासंदर्भात बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

★ शाश्वत विकासाचे १७ उद्दिष्टे साध्य करून राज्याचा तसेच पुण्याचा विकास करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास १०० ते ३०० कोटी  विशिष्ट मदत देण्यात यावी. तसेच फक्त ३ ते ५ उद्दिष्टावर काम झाल्याचे जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत दिसत आहे. परंतु १७ उद्दिष्टांचा समावेश जिल्हा नियोजनात घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी सदरील बैठकीत केली. याबाबत योग्य काळजी पुढील जिल्हा नियोजन बैठकीत घेण्याची सुचना श्री पवार यांनी यावेळी केली.

●  पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी, त्याठिकाणी भाविकांसाठी निवासस्थान व्यवस्था उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे डॉ.गोऱ्हे यांनी निवेदनात म्हंटले आहे. तसेच अष्टविनायक देवस्थानच्या विकासाबाबत राज्यसरकार प्रयत्न करत आहे. सर्व अष्टविनायक देवस्थानांना एकत्र जोडणारा महामार्ग उभारण्याची घोषणा झाली परंतु तो अद्यापही पुर्णत्वास आलेले दिसत नाही. त्यामुळे ठोस निर्णय अंमलबजावणी व्हावी ही  अपेक्षा डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. यात अष्टविनायक प्रश्नावरती अर्थमंत्री श्री पवार यांनी रायगड, नगर या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या सोबत आढावा घेऊन याला गती देण्यात येईल अशा प्रकरणी भूमिका स्पष्ट केली.

●  पुणे - बंगलोर महामार्ग धायरी फाटा येथे अपघात रोखण्यासाठी ट्राफिक पोलीस चौकीची स्थापना करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा. पुण्यातील टेकड्यांचा विकास आणि त्या टेकड्यांची निगा राखली जावी यासाठी वन विभागाच्या मार्फत आणि पुणे मनपाच्या संयुक्त विद्यामाने एक अभ्यास समिती स्थापन करून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी डॉ.गोऱ्हे यांनी अर्थमंत्री पवार यांना निवेदनातून दिले आहे.

यावेळी कोव्हिडं मुळे बरच आर्थिक बोजा पडलेला असला तर सर्व बाबतीमध्ये जास्तीत जास्त तरतूद करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अर्थमंत्री श्री पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 



संपर्क : योगेश जाधव,

९०२८३३३३०५

Post a Comment

Previous Post Next Post