नगरसेविका माया बारणे यांनी शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला



 पिंपरी - नगरसेविका माया बारणे यांनी शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने समितीमधील नऊ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बारणे यांनी आठवडाभरापूर्वीच म्हणजे 4 तारखेला हा राजीनामा दिला. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आज समोर आली. आठवडाभरानंतर राजीनाम्याचे वृत्त पुढे आल्याने आणि सदस्य पद मुदतीचा नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी केवळ तीनच महिन्याच्या कालावधीत राजीनामा दिल्याने महापालिका वर्तुळात एकच चर्चाकाही अडचणीमुळे हा राजीनामा देत असून तो मंजूर करण्यात यावा, असे बारणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.बारणे म्हणाल्या, माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मी हा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यामागे दुसरे काही कारण नाही. माझी निवड होऊन तीनच महिन्यांचा कालावधी झाला होता. आणखी नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. महापौर ढोरे म्हणाल्या, माया बारणे यांनी काही अडचणीमुळे हा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अन्य इच्छुक नगरसेवकाला संधी देण्यात येईल.

राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानणारे फलक शहरभर लावले होते. या फलकांनंतर संतोष बारणे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेशांच्या चर्चा रंगत होत्या. त्यातच आता माया बारणे यांनी शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा देत चर्चांना बळ दिले आहे. याबाबत माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, घरगुती कारणामुळे माया बारणे यांनी शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाचे त्यांचे कोणतेही नियोजन नाही. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत माझे वैयक्तिक नियोजन सुरू आहे. रंगली होती.

Post a Comment

Previous Post Next Post