20 लाख रूपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली
कोल्हापूर – एका संस्थेच्या 11 एकर जागेचं मूल्यमापन करण्यासाठी 20 लाख रूपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गणेश हनुमंत माने असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश माने यांनी एका संस्थेच्या मुल्यमापनासाठी 45 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. यावेळी त्यांना 20 लाख रूपयांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

Post a comment

0 Comments