महावितरणाविरुध्द भाजपा शिष्ट मंडळाने घेतली आक्रमक भूमिका




इचलकरंजी :  इचलकरंजी येथे घोरपडे नाट्यगृह परिसरातील काही व्यापाऱ्यांचे विज कनेक्शन आज विज महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांना पुर्व कल्पना अथवा नोटीस न देता  खंडित करण्यात आले, गेल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महावितरणाविरोधात टाळा ठोको हल्ला बोल आंदोलन करण्यात आले होते व आंदोलनामध्ये इचलकरंजी शहरातील कोणत्याही ग्राहकाचे विज कनेक्शन न तोडण्याची मागणी करुन तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला होता, परंतु या निवेदनाकडे महावितरणाने सोईस्कर दुर्लक्ष करून विज कनेक्शन तोडण्याचे धाडस केले. 

इचलकरंजी परिसरातील विज ग्राहकांचे कनेक्शन तोडल्याचे समजताच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या तातडीने आपल्या कार्यकत्यांनसमवेत महावितरण कंपनी मेन शाखा, स्टेशन रोड, इचलकरंजी येथे पोहोचून ठिय्या आंदोलन करून महावितरण कंपनीस धारेवर धरले तर भाजपाच्या दुसऱ्या शिष्ठमंडळाने आक्रमक भूमिका घेऊन सुंदर बाग येथील महावितरण शाखाधिकाऱ्यांना घेराव घातला व ग्राहकांचे  विज कनेक्शन पुन्हा जोडून पूर्ववत करण्यास भाग पाडले.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इचलकरंजी शहरातील कोरोना काळातील वीजबिल थकीत सामान्य नागरिकांपैकी जर कुणाचे विज कनेक्शन खंडित करण्यात आले तर भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपा शिष्ठमंडळामध्ये ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे, राजेंद्र पाटील, प्रदीप माळगे, आण्णा आवळे, अमित जावळे, शुभम बरगे, हेमंत वरुटे, पुष्कर उत्तुरे, मनोज तराळ, विजय कदम यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post