पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या किसान बाग आंदोलनामध्ये विविध जाती धर्माचे लोकांनी सहभाग घेऊन मुस्लिम समाज्याच्या नेतृत्वाखाली राजभर किसान आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

पुणे :  - दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहिनबागच्या धर्तीवर  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.27) किसानबाग आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनामध्ये  विविध जाती धर्माचे  लोकांनी सहभाग घेऊन मुस्लिम समाज्याच्या नेतृत्वाखाली राजभर किसान आंदोलनास पाठिंबा दर्शविला. 

 सदर आंदोलनास वंचितचे पुणे शहराध्यक्ष  मुनोवर कुरेशी , के जी एन मजहर फुड्स चे मजहर शेख,  मुस्लीम ओबीसी चे अध्यक्ष इक्बाल अन्सारी, कारी मु इद्रिस (जमियात उल्मा हिंद पुणे)  मुप्ती अहमद, हुसेन कास्मी, इमाम कौन्सिल, गौस भाई शेख मुझफर इनामदार, जावेद शेख , रिजवान  फहीम शेख,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष मुनोवर  कुरेशी व सर्व समाज्याच्या तरुणांनी पुढाकाराने हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. 

   सदर प्रसंगी बहुजन आघाडी चे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते वसंत दादा साळवे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य धनराज वंजारी अनिल जाधव संतोष संखद तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सीमाताई भाले सईन व कार्यकारणी पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर व कार्यकारणी आदी उपस्थित होते. कुंभार बावडी व्यापारी संघटनेचे प्रमुख फय्याज सय्यद व सर्व व्यापारी संघटना सहभागी झाले होते. शेवटी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे आभार  शीख समाजाचे सोनू सुरी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a comment

0 Comments