'फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन' विषयावरील राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

                                                                                  

'फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन'परिषदेत राकेश मित्तल यांचा सत्कार 



 पुणे :  'फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन' विषयावरील परिषदेला बुधवारी चांगला  प्रतिसाद मिळाला. दिल्ली येथे झालेल्या या परिषदेत  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल (पुणे ) यांचा सत्कार मालदीवचे शिक्षण मंत्री मरियम नासीर यांच्याहस्ते झाला.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या  डीबीए आणि पीएचडी विषयाचे पूर्णवेळ अभ्यासक्रमांचे उदघाटन परिषदेत करण्यात आले.  सेंटर ऑफ एज्युकेशनल डेव्हलपमेंट ' (सीईडी )आणि कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे 'फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन' विषयावर राष्ट्रीय परिषद  आयोजित केली होती.  ही सहावी वार्षिक राष्ट्रीय परिषद होती .नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग 'चे माजी अध्यक्ष  सी बी शर्मा,मालदीव चे शिक्षण मंत्री मरियम नासीर ,सीबीएसई चे सचिव अनुराग त्रिपाठी,दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिनेश सिंग यांच्यासह अनेक शिक्षण तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले.       

Post a Comment

Previous Post Next Post