समितीच्या अहवालानंतरच पुढील दोन वर्षांत कार्यकारिणीच्या निवडणुकांचे भवितव्य निश्‍चित होणार आहे.



पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीला पुढील पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा मुद्दा वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. यावेळी सभासदांमध्ये वादावादी झाली असून काही काळ गोंधळाचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यानंतर याबाबत समिती गठीत करण्यात येणार असून, या समितीच्या अहवालानंतरच पुढील दोन वर्षांत कार्यकारिणीच्या निवडणुकांचे भवितव्य निश्‍चित होणार आहे

महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी एस.एम.जोशी सभागृहात रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यकारी विश्‍वस्त उल्हास पवार यासह पदाधिकारी सभेच्या सुरूवातीला पवार यांनी आर्थिक जमा-खर्चासह आगामी अर्थसंकल्पाचा आढावा घेतला. या सभेत विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याच्या मुद्‌द्‌याबाबत झालेल्या चर्चेवेळी मते व्यक्त करताना सभासदच एकमेकांना भिडल्याची घटना घडली. विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याबाबत सभेत आवाजी मतदान घेण्यात आले. सदस्यांनी बहुमताने कार्यकारिणीला मुदतवाढ देण्यास पाठींबा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post