आयुुक्त विक्रम कुमार यांची भाजपशी जवळीक त्यांनाच भोवण्याची शक्‍यता आहे.



पुणे - 'शहराच्या विकास कामांबाबत आयुक्‍त भाजपच्या सांगण्यानुसार काम करून शहराच्या हिताला बाधा पोहचविण्याचे निर्णय घेत आहेत. विरोधी पक्ष पदाधिकारी, नगरसेवकांची कामे-समस्यांबाबत वेळकाढूपणा केला जात आहे,' असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्‍तांची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयुुक्त विक्रम कुमार यांची भाजपशी जवळीक त्यांनाच भोवण्याची शक्‍यता आहे.

येत्या शुक्रवारी महापालिकेच्या प्रश्‍नांबाबत तसेच चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामांची माहिती देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी पवार यांच्याकडे वेळ गेल्या काही दिवसांत 9 मीटरच्या आतील रस्त्यांचे रुंदीकरण, विकास नियंत्रण नियमावलीत परस्पर बदल, पीपीपीद्वारे करण्यात येणारे रस्ते, तसेच इतर काही प्रशासकीय निर्णयांवरून भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू आहेत.

त्यातच सत्ताधारी भाजपला अडचणीत पकडण्यासाठी विरोधक संबंधित निर्णय, प्रस्ताव तसेच त्यांची माहिती मिळावण्यासाठी आयुक्ताच्या भेटी घेत आहेत. मात्र, आयुक्‍त याबाबत 'आपल्याकडे माहिती नाही', 'लवकरच सादरीकरण करू', 'बैठक घेण्यासाठी वेळच मिळत नाही' अशी उत्तरे देत आहेत, असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.विकासकामांच्या निविदांत भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप दिले जात असून विरोधी नगरसेवकांना भेटही दिली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे तसेच 'आयुक्त हे भाजपचे नाहीत, तर शहराचे आहेत,' याचा विसर त्यांनी पडू देऊ नये अशीही टीका करण्यात येत आहे. आहे.

Post a Comment

Previous Post Next Post