पुणे : दुचाकी ला साईड मिरर नसल्यास होणारं दंडात्मक कारवाई.

दुचाकीला साईड मिर्रर नसल्यास दंडात्मक कारवाई.


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला:
 
 पुणे शहरात दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दुचाकींची संख्या जास्त असल्याने वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनाही तितक्याच घडत असतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दरवर्षी कोट्यवधींचा दंड वसूल केला जातो.  हेल्मेट सक्तीचा मुद्दा पुण्यात गाजला होता. आत पुणेकरांना दुचाकी चालवताना साईड मिरर नसल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

मागील वर्षांपासून पुणेकरांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर लगेच कोविड-19 मुळे शहरांमध्ये मास्कची सक्ती करावी लागली. त्यामुळे मास्क घालणाऱ्या नागरिकांकडून पुन्हा एकदा कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यात आली. आणि आता पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांकडे बोट दाखवत दंड वसुली केली जाणार आहे. जर तुमच्या दुचाकीला दोन्ही बाजूचे आरसे नसतील तर तुमच्याकडून दोनशे रुपयांचा दंड घेतला जाणार आहे.

Post a comment

0 Comments