हुपरी नगरपरिषदेचा अजब व अनागोंदी कारभार

 कुणी प्रेत जाळायला शेणी देतं का शेणी...!


▪️हुपरी नगरपरिषदेचा अजब कारभार.

▪️विकासकामांचा टंच झिरो

▪️प्रेतं जाळायला शेणी नाही.


हुपरी नगरपरिषदेच्या अजब कारभाराच्या गजब गोष्टी सर्वांना माहीत आहेतच.आज हुपरी नगरपरिषदेच्या वैकुंठभूमीत आमच्या प्रतिनिधींना  काही धक्कादायक गोष्टी दिसल्या.स्मशानभूमीची यंत्रणा पार कोलमडून गेली असून अक्षरशः गोडाऊनमध्ये प्रेतं जाळायला शेणीच नसल्याचे दिसले.

केवळ गलिच्छ राजकारणात लक्ष देणाऱ्या सत्ताधारी ताराराणी आघाडी व भाजपाच्या नगरसेवकांना सद्या तरी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांचा राजीनामा घेणे, अविश्वास दाखल करणे याखेरीज काहीही दिसेनासे झाले आहे. सत्ताधारी ताराराणी आघाडी व भाजपाच्या नेत्यांनी व  नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष  भरत लठ्ठे यांची एवढी भिती घेतली आहे की इतिहासातल्या धनाजी संताजी प्रमाणे या सत्ताधारी मंडळींना सर्वत्र भाजपाचे मान्यताप्राप्त पक्षप्रतोद भरत लठ्ठेच दिसत आहेत त्यामुळे शहरातील सर्व कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

स्मशानभूमीत जळणच नसणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

हुपरी नगरपरिषदेतील सत्ताधारी ताराराणी आघाडी व भाजपाच्या नगरसेवकांनी राजकारणातून वेळ काढून परिस्थिती जाणून घ्यावी.

निवडणूकीत लोक ह्यांना जवळ कोण करणारच नाहीत.

Post a comment

0 Comments