आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर'शिवसेनेचे मिशन 2022′ अभियान सुरूपिंपरी :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक वर्षभरावर आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी ज्या-त्या ठिकाणी संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, ज्या भागात ताकद कमी आहे. तेथे ताकद वाढविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर'शिवसेनेचे मिशन 2022′ अभियान सुरू आहे. शिवसेनेने कंबर कसली आहे. त्याअंतर्गत शिवसेनेच्या प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत. पिंपरी, संत तुकारामनगर येथे नुकतीच बैठक झाली.

त्यावेळी खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवापदाधिकारी जितेंद्र ननावरे, विभागप्रमुख राजेश वाबळे, अभिजीत गोफण आदी पदाधिकारी उपस्थित होते.खासदार बारणे म्हणाले, की, महापालिकेतील अनागोंदी कारभार, चुकीची कामे जनतेपुढे मांडा. महापालिकेतील भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या वृत्तपत्रात प्रसारित येणाऱ्या बातम्यांचे कात्रण काढून घरोघरी पोहोचवावीत. जेणे करून महापालिकेतील चुकीचा कारभार जनतेपर्यंत पोहोचेल. सर्वच बातम्या जनमाणसापर्यंत पोहचतात असे नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना वस्तुस्थिती पटवून द्यावी.

जितेंद्र ननावरे, अभिजित गोफण यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले. तर, राजेश वाबळे

Post a comment

0 Comments