लॉकडाउनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर करवाई पाठवलेल्या कलम 188 च्या नोटीसेस मागे घेण्याबाबत गृहविभागाशी चर्चा करत आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊ,' असे आश्‍वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.



पुणे - 'लॉकडाउनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर करवाई पाठवलेल्या कलम 188 च्या नोटीसेस मागे घेण्याबाबत गृहविभागाशी चर्चा करत आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊ,' असे आश्‍वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, सदस्य प्रदीप देशमुख, विनोद पवार यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन कलम 188 संदर्भातील कारवाई मागे घेण्याची विनंती करणारे निवेदन दिले.

प्रदीप देशमुख म्हणाले, 'रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलिसांनी समज देऊन त्यांची नावे त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाईच्या नोटीसेस पाठविण्यात येत आहेत. यातील अनेक नागरिक अत्यावश्‍यक कामासाठीही बाहेर पडले होते. आता त्यांना नोटीसेस येत असल्यामुळे कायदेशीर कारवाईची भीती निर्माण झाली आहे. एकट्या पुणे शहरातच असे 28 हजारांवर नागरिक आहेत.

राज्याचा विचार केला तर हा आकडा काही लाखांत आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन पाठवलेल्या नोटीसेस रद्द कराव्यात, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी गृह सचिवांशी चर्चा करून राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे.' घेतली होती.

Post a Comment

Previous Post Next Post