पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रभारीपदी आमदार माधुरी सतीश मिसाळ यांची नियुक्‍ती.

 


 PRESS MEDIA LIVE :

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रभारीपदी आमदार माधुरी सतीश मिसाळ यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना नियुक्‍तीपत्र दिले आहे. मिसाळ या पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मिसाळ यांच्या नियुक्तीने शहर भाजपामधील वाद संपुष्टात येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपामध्ये चिंचवड आणि भोसरी असे दोन तर निष्ठावंतांचा तिसरा गट कार्यरत आहे. महापालिकेतील ठेकेदारी, पदाधिकारी नियुक्ती आणि इतर बाबींवरून या गटा-तटामध्ये वारंवार वाद उफाळून येत आहेत. याशिवाय स्थायी समितीमध्ये भाजपांतर्गत सुरू असलेल्या वादामुळे पक्षाची प्रतिमाही मलिन होत असल्याचे वारंवार समोर आले आहे.आता मिसाळ यांच्या नियुक्तीने हे वाद मिटतील का? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अंतर्गत मतभेद मिटविण्याबरोबरच महापालिकेतील सत्ता राखण्याची जबाबदारीही मिसाळ यांना सांभाळावी लागणार आहे.

माधुरी मिसाळ सध्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळत असून, त्या पुण्यातून तीन वेळा विधानसभेवर निवडून आल्या आहेत.पक्ष संघटन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पक्षाकडून पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हा समन्वय साधला जाणार आहे.

- माधुरी मिसाळ, आमदार


Post a comment

0 Comments