PRESS MEDIA LIVE : यड्राव : आप्पासाहेब भोसले :
यङ्राव- (तालुका शिरोळ ) येथिल पार्वती इंङस्ट्रीयल इस्टेट मध्ये एका तरुणाने कंपाउंङच्या अँगलला स्वतःच्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (रविवार) सकाळी उघङकिस आला.
सचिन बसवराज पाटील वय-30 ( रा.पार्वती गेटसमोर खोतवाडी)
असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, त्याने मानसिक ताणतणावाखाली आत्महत्या केल्याचे समजते
सचीन पाटिल यांने आज सकाळी आत्महत्या केल्याचे तेथिल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती शहापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठया प्रमाणात होती