हुपरी नगरपरिषद विषय समिती सभापती निवडीसाठी भाजपा पक्षप्रतोद भरत लठ्ठे यांचा व्हिप लागू



हुपरी 

हुपरी नगरपरिषदेतील भाजपा गटाचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून नगरपरिषदेतील भाजपा पक्षप्रतोद भरत लठ्ठे यांनी  भाजपा नगरसेवकांना व्हिप (आदेश) लागू केला आहे त्यामुळे भाजपा गोटात खळबळ उडाली आहे.

पक्षप्रतोद भरत लठ्ठे यांनी नमूद केलेप्रमाणेच नगरसेवक- नगरसेविकांनी समिती सभापती नामनिर्देशन पत्रावर सुचक म्हणून सह्या कराव्यात असा आदेश काढलेला आहे.

त्यांनी या आदेशात असे म्हटले आहे की, वरील आदेशाचे पालन न केलेस, पक्षविरोधी सुचक म्हणून सही केलेस अथवा गैरहजर राहीलेस महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८७ चे कलम ३(१) मधील तरतूदीनुसार अशा नगरसेवकांना नगरसेवक म्हणून कायम राहणेस अनर्हता प्राप्त होईल. म्हणजेच नगरसेवक पदावर राहता येणार नाही. त्यांनी पुढे म्हटले आहे की नगरपरिषद स्थापणेपासून पक्षात कोणतेही पद बदल झालेले नाहीत. पक्षप्रतोद व पक्षाचे सर्व अधिकार मलाच दिलेले आहेत.

उपनगराध्यक्ष व पक्षप्रतोद भरत लठ्ठे यांच्या धोबीपछाड मुळे हुपरी नगरपरिषदेच्या भाजपा गोटात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post