केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी केले स्वागत. मुंबई : कस्तुरबा पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या गुन्हेगारीवर चाप बसवल्यानंतर आता संजीव पिंपळे हे जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी पोलीस ठाण्यात सज्ज झाले आहेत. 

मेघवाडी पोलीस ठाणेचे सिंघम म्हणून ज्यांना ओळखले जायचे ते सुधीर निगुडकर यांनी सलग दीड वर्षे रात्रंदिवस एक करून मेघवाडी हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घातला. या दरम्यान निगुडकर यांना आरोग्य संबंधित समस्या सुद्धा उद्भवल्या होत्या पण तरीही आपल्या जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केला व आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. 

गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबईत बहुतांश पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची बदली करण्यात आली. 

काही दिवसांपूर्वीच मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संजीव पिंपळे हे रुजू झाले आहेत. संजीव पिंपळे हे या अगोदर कस्तुरबा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या दरम्यान पिंपळे यांनी आपल्या कडक अंदाजाने बऱ्याच मोठ्या गुन्ह्यांवर आळा घातला. आता मेघवाडी हद्दीत असणाऱ्या काही समाजकंटकांवर सुद्धा माझी खास नजर असेल असे त्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान पिंपळे यांच्या स्वागतासाठी केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए.) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच मुंबई डेज चे कार्यकारी संपादक अरविंद बनसोडे व सामाजिक कार्यकर्ते अजय शेलार यांनी वैयक्तिक रित्या भेट घेऊन पिंपळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Post a comment

0 Comments