मिरज : खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळुन एक निवृत्त हवालदार पत्नी मुलासह आत्महत्या



मिरज : खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळुन एक निवृत्त हवालदार पत्नी मुलासह आत्महत्या करतो. ही एकमेव घटना पोलिसांबद्दलच नव्हे तर सर्वच व्यवस्थांची विश्वासर्हता संपल्याचे द्योतक आहे. मिरज पुर्व भागात खासगी सावकारांचा विळखा दिवसागणिक घट्ट होतो आहे. मात्र, संबधीत यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष का ? याचा शोध आता जिल्हा पोलिस आधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम आणि जिल्हा सहकार निबधंकाना घ्यावा लागेल.

वास्तविक मिरज पुर्व भागाला मिळालेले पाणी, शेतीमध्ये झालेल्या सुधारणा यासह अनेक कारणांमुळे मिरज पुर्व भाग समृध्द असल्याचे भासत असले. तरी तेथील भुमीपुत्र मात्र खासगी सावकारीमुळे अक्षरशः देशोधडीस लागल्याकडे मात्र, कोणाचे लक्ष नाही.मुळात ही खासगी सावकारी मिरज पुर्व भागात घुसली कशी याचाही शोध केवळ पोलिसांनाच नव्हे तर सामाजिक संस्था आणि स्थानिक कारभाऱ्यांनाही घ्यावा लागेल.

यासाठीची जी मुख्य कारणे आहेत.त्यामध्ये शेतीसाठीचा पतपुरवठा कमी होण्यासह शेती सुधारण्यासाठी होणारी भरमसाठ गुंतवणक, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान, विमा कंपन्यांकडून झालेली फसवणूक टग्या कर्जदारांच्या बुडवेगिरीचा प्रामाणिक कर्जदारांना होणारा त्रास, यासह अनेक आहेत. याचाच अचुक लाभ घेत खासगी सावकारांनी मिरज पुर्व भागात आपले पाय पसरले.स्थानिक राजकीय टग्यांनीही झटपट श्रीमंत होण्यासाठी खासगी सावकारीचा सोपा मार्ग निवडला. या सगळ्या घडामोडी आणि उघडउघड निर्माण होत असलेल्या टोळ्यांबाबत पोलिस अनभिज्ञ असणे कदापी अशक्‍य आहे. यापैकी अनेक खाजगी सावकारांकडे तर सहकार विभागाच्या परवानग्याही नाहीत. सहकार विभाग आणि पोलिसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळेच शेजारच्या कर्नाटकातील खाजगी सावकारांनीही याच पूर्व भागातील अनेक छोट्या गावांमध्ये आपले कर्जाचे फासे टाकले आहे


                ओंकार पाखरे : शिरोळ तालुका प्रतिनिधी :

आता मुद्दा आहे तो पोलिसांच्या विश्वासार्हतेचा. खासगी सावकारांचा आत्मविश्वास एवढा वाढला की मामला पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला तरी तो कसा 'निकाली' काढायचा याचेही कौशल्य त्यांनी अल्पावधीत अवगत केले असल्याने पोलिस ठाण्यात गेले तर न्याय मिळेल याची खात्री नाही. असेच सध्या चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post