माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्रच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी श्री गौरव बुट्टे तर जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री संदीप बोंदरवाल यांची नियुक्ती.

PRESS MEDIA LIVE : जालना :


माहितीचा अधिकार हा कायदा सर्व प्रथम स्वीडन मध्ये इ.स.१७६६ मध्ये लागू झाला भारत देश हा अशा प्रकारचा कायदा करणारा जगातला ५४ वा देश आहे महाराष्ट्र राज्यात माहितीचा अधिकार अधिनियमाच्या १५ व्या कलमाच्या पहिला पोटकलमानुसार करण्यात आली सर्व सामान्य जनतेला शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, प्रशासकीय कार्यपद्धती, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, शासकीय कार्यपद्धती बद्दल सामान्य जनतेला संशय वाटू नये, शासकीय कामामध्ये नियम व इतर गैरव्यवहारास वाव राहू नये, जनतेची कामे विनाविलंब सहजपणे व्हावीत यासाठी माहितीचा अधिकार कायदयाची निर्मिती झाली परंतु बऱ्याच ठिकाणी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही सर्वसामान्य नागरिक आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात जातो तेंव्हा बरेच कामचुकार अधिकारी त्यांना उडवा-उडवीचे उत्तर देतात व कामेही करतांना दिसून येत नाही थोडक्यात सर्वसामान्य जनतेपर्यंत माहितीचा अधिकार काय आहे त्याचे महत्त्व काय आहे त्याचा वापर कसा करावा हे कळलेच नाही म्हणूनच सामान्य नागरिकाचे शासकीय कामे होण्यास विलंब होतांना दिसून येत आहे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात याच बाबींचा गांभीर्याने विचार करून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली असून समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर यांच्या सहमतीने महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री इद्रीस सिद्दीकी, महाराष्ट्र राज्य सचिव श्री सुभाष भोसले, महाराष्ट्र राज्य संघटक श्री दिनेश शिंदे यांनी विचार विनीमय करून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रच्या मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्ष पदी श्री गौरव नारायणराव बुट्टे तर जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री संदीप बाळासाहेब बोंदरवाल यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती नंतर गौरव बुट्टे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की "सर्व सामान्य गोर गरीब जनतेला माहितीच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देणार त्याच बरोबर माहिती अधिकारात शासनाचे परिपत्रके, अभिलेख, दस्तावेज, हजेरी पत्रक, लाँग बुक, शासनाने काढलेले विविध विभागाचे आदेश, अहवाल त्याच्या नकला प्रती कोणत्याही कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणावर साठवलेली माहिती कशी मिळवता येईल व माहिती अधिकाराचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले जाईल त्याच बरोबर कोठेही अन्याय, अत्याचार होत असेल तर पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला निर्भिडपणे वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार जेणेकरून कुणावरही अन्याय, अत्याचार होणार नाही"

         श्री गौरव बुट्टे यांची मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्ष पदी व श्री संदीप बोंदरवाल यांची जालना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post