करोना लसीकरण पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिलीPRESS MEDIA LIVE :

मुंबई - देशात आजपासून जगातील सर्वात मोठ्या करोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. राज्यातही आजपासून करोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र उद्यापासून राज्यातील करोना लसीकरण पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली असून तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

देशातील करोना लसीकरणासाठी नाव नोंदणी केंद्र सरकारने तयार केलेल्या को-विन ऍपद्वारे करणे सक्तीचे आहे. मात्र यामध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याने राज्यातील लसीकरण येत्या १८ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरु असल्याचंही सांगण्यात आलंय.

Post a comment

0 Comments