इंडियन रिपोर्टर असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांना महाराष्ट्र गौरव 2021 पुरस्कार घोषित...साप्ताहिक. हुपरी समाचार. (वसंतराव पाटील): परभणी येथील जन सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव 2019 पुरस्कार इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांना जाहीर. श्रीदेवी पाटील यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे सभासद अभियान राबविल्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जन सहयोग सेवाभावी संस्था गेली 29 वर्ष 26 जानेवारीला शहीद जवानांच्या स्मृति निमित्त जरा याद करो कुर्बानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रत्येक वर्षी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते या कार्यक्रमास परभणीतील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात अशाच या कार्यक्रमांमध्ये हे श्रीदेवी पाटील यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराचे वितरण 26 जानेवारी 2021 रोजी दुपारी दोन वाजता परभणी येथे देण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याची जन सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने

[1/19, 9:03 PM] साप्ताहिक. हुपरी समाचार. (वसंतराव पाटील): संयोजक महमूद खान संपादक परभणी आज तक यांनी श्रीदेवी पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र देण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने श्रीदेवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले की हा पुरस्कार माझा नसून इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्या पुढे म्हणाल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्याकरिता आमची संघटना सदैव तत्पर आहे. इंडियन रिपोर्ट असोसिएशन ही भारतातील .सर्वात मोठी 62 हजार सभासद असलेली संघटना आहे. अलीकडेच ही संस्था संपूर्ण जगभर कार्य करण्यासाठी इंडियन रिपोर्टर असोसिएशन ने जाहीर केले आहे.

Post a comment

0 Comments