साप्ताहिक शाहूवाडी टाइम्स च्य वतीने इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांचा सत्कार.

साप्ताहिक शाहुवाडी टाइम्स च्या वतीने इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांचा सत्कार.


PRESS MEDIA LIVE :


इंडियन रिपोर्टर असोसिएशन'च्या महाराष्ट्र राज्य महिला विंग च्या सचिव श्री देवी पाटील व मिरज तालुका अध्यक्ष उज्वला मोरे यांची बांबवडे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील साप्ताहिक शाहूवाडी टाइम्स या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन संपादक मुकुंदराव पवार यांना सदस्य बनवून त्यांची शाहुवाडी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य महिला सचिव पदी निवड झाल्याबद्दल व उत्कृष्ट कार्याबद्दल इंडियन रिपोर्टर असोसिएशन यांचेकडून 2020 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीदेवी पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मिरज तालुका अध्यक्ष उज्वला मोरे यांनाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना श्रीदेवी पाटील यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय व हक्क मिळावा तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले यांची चौकशी व्हावी वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पत्रकारांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत होत नाही ती व्हावी तसेच प्रमाणित वृत्तपत्रांच्या संपादकांना शासनमान्य पत्रकार म्हणून नियुक्त करावे नोंदणीकृत नोंदणीकृत वृत्तपत्रांच्या संपादकांना महाराष्ट्र शासनाच्या पाच जाहिराती 15 ऑगस्ट 26 जानेवारी एक मे दिपावळी व वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाची जाहिरात मिळालीच पाहिजे या सर्व मागण्यांसाठी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने शासनाकडे पत्रव्यवहार सुरू असून लवकरच त्याचा पाठपुरावा होईल असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

Post a comment

0 Comments