हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिव खोत यांचे निधन


   हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिव खोत यांचे निधन... 


PRESS MEDIA LIVE :  खोतवाडी : आप्पासाहेब भोसले

हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील हातकणंगले पंचायत समीतीचे माजी सभापती सदाशिव नारायण खोत  यांचे वृद्धपकाळाने निधन झाले . ते ८५ वर्षांचे होते .

तारदाळ खोतवाडीचे राजकारणातील अनुभवी व्यक्तीमत्व असणारे ज्येष्ठ नेते व हातकणंगले तालुका पंचायत समितीचे सलग दोन वेळा सभापती पद भुषवलेले सदाशिव  खोत ( तात्या ) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. अत्यंत शांत, संयमी असा त्यांचा स्वभाव होता . राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला होता .त्यांच्या निधनाने तारदाळ खोतवाडी गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी त्यांना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी , सामाजीक क्षेत्रातील मान्यवर यांनी आदरांजली वाहिली .त्यांच्या मागे चार मुले, पाच नातवंडे, व परतुंडे असा मोठा परिवार आहे.

Post a comment

0 Comments