*शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते केखले प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका प्रदान..

  


हातकणंगले :  (प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)

*ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध असणारी रूग्णवाहीका प्रदान करण्यात आली.आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून केखले प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) व माजी समाजकल्याण सभापती मा.विशांत महापुरे यांच्या विशेष प्रयत्नातून केखले केंद्रास ही रूग्णवाहिका मिळाली.

पन्हाळा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर,केखले केंद्राचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस बी पाटील, कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल अभिवंत, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, माजी संचालक के.आर. पाटील, प्रवक्ते व सरचिटणीस ॲड राजेंद्र विष्णू पाटील, माजी जि.प.सदस्य डॉ.बी.टी.साळोखे, जाखलेचे तंटामुक्त अध्यक्ष रणजित शिंदे-सरकार, बहिरेवाडीचे सरपंच शिरीषकुमार जाधव, मारूती पाटील, दिलीप पाटील, सतिश पाटील, अनिल महापुरे, अरूण महापुरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...*

Post a comment

0 Comments