अनधिकृतपणे बागेसाठी आरक्षित बंगला बांधून केले अतिक्रमण.

 कृषी/वन अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे
बागेसाठी आरक्षीत बंगला बांधुन केले आतिक्रमण. जिल्हाधिकारी यांचे केली कारवाईची मागणी                            


PRESS MEDIA LIVE : सांगली : प्रतिनिधी :

सांगली   : श्री वैभयकुमार विलास शिंदे या कृषी/वन  अधिकाऱ्यांनी सांगलीत मंगलमुर्ती कॉलनीमध्ये बागेसाठी आरक्षित असलेल्या  जागेवर व रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करून बंगला बांधल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे 21 डिसेंबर रोजी केली असता त्यांनी याबाबतची चौकशी करण्याचे आदेश सामिकु महानगरपालिकेस केली असून त्याबाबत अहवालाची मागणी व केलेल्या कारवाईची मागणी केली आहे. तसेच विलास शिंदे यांच्यावर शासकीय वन अधिकारी असल्याने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी  मागणी करण्यात आलेली आहे. 

मंगलमूर्ती कॉलनी डी-मार्ट जवळ सर्वे नंबर 445/1 यातील दोन हजार स्क्वेअर मीटर जागा बागेसाठी आरक्षित आहे त्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यासाठी 2013 साली विठ्ठल रेड्डी बिरादर यांनी प्रयत्न केला होता त्यांना सांगली महानगरपालिकेच्या वतीने  तारीख 7 /5 /2013 रोजी नोटीस देऊन अतिक्रमण केलेले शेड काढून घ्यावे असे कळविण्यात आले होते. परंतु अतिक्रमण काढणे ऐवजी विठ्ठल रेड्डी बिरादर यांनी ही जमीन शासकिय वन अधिकारी असलेल्या विलास वैभव विलास शिंदे यांना हि जमीन अनाधिकृतपणे विकली. वैभव विलास शिंदे हे शेती वन खात्यातले अधिकारी असल्याने (सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अधिकारी आहेत). त्यांनी ही अनाधिकृत जमीन विकत घेऊन बागेसाठी आरक्षित जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधलेले आहे.

 इतकेच नव्हे तर हा बंगला रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण करून बांधला आहे. याबाबत शासकीय अधिकारी असल्याचा वापर करून महानगरपालिकेकडून स्वतःवर काही कारवाई होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूस आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगला बांधला जातोय आणि तोसुद्धा एक शासकीय कर्मचाऱ्याकडून बांधला जातोय तरीही महानगरपालिकेकडून या वैभव विलास शिंदे यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. विशेषता नागरिकांच्या कडून तक्रारी केल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे 

त्यानंतर वैभव विलास शिंदे यांनी सिटीसर्वे मध्ये वशिला लावून आणि शासकीय अधिकारी  असल्याचा प्रभाव पाडून स्वतःचे सिटीसर्वे ला नाव लावून घेतलेले आहे याबाबत चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आलेली होती.जिल्हाधिकारी यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे महानगरपालिकेस आदेश केलेले आहेत.

तरीही अद्याप महानगरपालिकेने काहीही कारवाई केलेली नाही दरम्यान या संदर्भात 30 डिसेंबर 2000 20 रोजी मिरज तहसीलदार यांनी महानगरपालिकेत लेखी आदेश करून याबाबत केलेली कारवाई 11 जानेवारीपर्यंत महापालिकेने तहसीलदारास लिखी कळवावे असे कळविले आहे तरी अद्याप याबाबत महानगरपालिकेने काहीही कारवाई केलेली नाही याबाबतचे पत्र सोबत जोडलेले आहे 

सध्या सांगलीमध्ये आरक्षित जागेवर ज्या  वसाहती तयार झालेले आहेत त्या नियमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु यामध्ये अतिरेक होऊन महानगरपालिकेकडून असाही प्रयत्न केला जातो आहे कि ज्या जमिनी  नागरिकांच्या साठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरक्षण आहे त्यावर सुद्धा अतिक्रमण झालेले आहे त्यांनाही सवलत देण्याचा प्रयत्न चालू आहे हे चिंताजनक असून सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे संरक्षण झाले पाहिजे.

    विशेषता शासकीय अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कायद्याचे पालन करावे परंतु हे वैभव विलास शिंदे यांनी सर्व जमिनी विषयक कायदे पायदळी तुडवून आणि स्वार्थी हेतूने आरक्षणाच्या भूखंडावर बंगला मधून वशिल्याने नियमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी करून चौकशी झाली पाहिजे 

  वैभव विलास शिंदे यांनी अतिक्रमण करून अतिक्रमण बंगल्या समोर शासन मान्य लोकप्रबोधन वाचनालाय आहे त्या वाचनालयास जाण्यायेण्याचा  रस्ता अडवून तो बंद करण्याचे कारस्थान वैभव शिंदे यांचे कडून कडून सुरू आहे. त्यामुळे या  सर्वच प्रकरणाची गंभीरपने चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे

       तसेच मुंबई उच्च न्यायालय आदेशानुसार अद्यापही बेघरांना घरकुले मिळालेले नसल्यामुळे ती घरकुले मिळेपर्यंत ही उपोषण करण्यात येणार आहे.यासाठी या भागातील नागरिक व बेघर नागरिक सोमवार दिनांक 18 जानेवारी  पासून सामीकू महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण करणार आहेत . याबाबतचा निर्णय 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बेघर यांच्यावर नागरिकांच्या व्यापक बैठकीत घेण्यात आला.तसेच असे पत्रक सांगली जिल्हा निवारा संघाचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी,संघटनेचे पदाधिकारी कॉ विजय बचाटे, कॉ सुमन पुजारी , कॉ वर्षा गडचे, नंदा कामते, यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post