मत 'दान ' नको तर मताधिकार वापरुया : प्रसाद कुलकर्णी

 मत 'दान ' नको तर मताधिकार वापरूया

          प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

            ( ९८ ५०८ ३० २९० 


PRESS MEDIA LIVE : 

बंधू भगिनींनो,

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीसाठी मताधिकार बजावायचा आहे.

मताधिकार बजावणे हे लोकशाहीच्या अनमोल ठेव्याच्या जोपासनेसाठी आणि त्याच्या बळकटीकरणा साठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना मताचा हक्क आहे तो त्यांनी बजावला पाहिजे.मताधिकार आपली ग्रामपंचायत कशी असावी या संबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा, अशी इच्छा व्यक्त करणारा नागरीक म्हणजे मतदार.

लोकशाही व लोकांची सार्वभौम सत्ता या आपल्या राष्ट्राच्या पायाभूत संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून आपण मताच्या अधिकाराकडे पाहिले पाहिजे. हा मताधिकार बजावताना आपण जेवढे जागरूक, जाणकार, दूरदृष्टीचे, तात्पुरत्या मोहाला बळी न पडणारे असू तेवढे आपले ,देशाचे ,गावाचे हित सुरक्षित राहील. एका अर्थाने मताधिकार हा नवा समाज घडविण्याचा अधिकार आहे. 

आपले मत अनमोल आहे.ते कोणाच्या भिडेपोटी किंवा आंधळेपणाने द्यायचे नसते तर डोळसपणे  मताधिकार बजावला पाहिजे. मत हा आपला  ‘अधिकार ‘आहे ती ‘दान’ करण्याची, गहाण टाकण्याची किंवा विकण्याची वस्तू नाही. तसेच आपण निवडणूक व्यक्तिकेंद्रित, उमेदवार केंद्रित नाही तर, मतदारकेंद्रीत केली पाहिजे.जो उमेदवार, त्यांचा पक्ष, त्यांचे कार्यकर्ते मताच्या मोबदल्यात पैसे, वस्तू, जेवण अथवा कोणत्याही प्रकारची भेट देत असेल, तशी आश्वासने देत असेल तर, ही मंडळी शंभर टक्के भष्टाचारी आहेत व तो अधिक प्रमाणात करण्यासाठीच त्यांना निवडून जायचे आहे हे ओळखून त्यांना  आपण मत देऊच नये.म्हणूनच मत 'दान ' करू नका तर मताचा अधिकार बजावा ही नम्र विनंती.


          

Post a Comment

Previous Post Next Post