*इचलकरंजी शहरातील मोकाट आणि भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना करणेसाठी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न.*


       

 इचलकरंजी शहरात सर्वत्र मोकाट आणि भटक्या जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.त्यामुळे शहरातील अनेक मुख्य तसेच उपरस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवून ठिक ठिकाणी वाहनधारक नागरिकांचे अपघात होत आहेत.यामुळे शहरात नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर उपाय योजना करणे साठी नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका  स्वामी यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. 

    या बैठकीमध्ये वृत्त पत्रामध्ये जाहीर सुचना देवुन ७ दिवसांत संबंधित मालकांनी त्यांची जनावरे ताब्यात घेऊन आपल्या स्वतःच्या जागेत त्यांची बांधण्याची व्यवस्था करणेची आहे. तसे न केल्यास नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मोकाट जनावरांच्या बाबत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेत येईल. आणि याबाबत नंतर कोणत्याही तक्रारीची  दखल घेतली जाणार नाही. असा महत्वपूर्ण  निर्णय घेण्यात आला.

        या बैठकीसाठी पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार,जेष्ठ नगरसेवक शशांक बावचकर,उप मुख्य अधिकारी केतन गुजर,नगर अभियंता संजय बागडे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा. नगररचना कार रणजित कोरे, जल अभियंता अंकिता मोहिते, शाखा अभियंता बबन खोत,मुख्य स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, शहाजी भोसले आदि उपस्थित होते.


   जनसंपर्क अधिकारी

इचलकरंजी नगरपरिषद

Post a comment

0 Comments