आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी भेट देऊन पाहणी केली

L





PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : 

इचलकरंजी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून वॉशआऊटनंतर वाया जाणार्‍या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी *महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इचलकरंजी नगपरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून 10 लाख लिटर क्षमतेचे पुनर्वापर केंद्र संप व पंप गृह* उभारण्यात आले आहे. या कामाची *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी भेट देऊन पाहणी केली. यासाठी 1 कोटी 43 लाख रुपये खर्च आला असून या अंतर्गत वाया जाणार्‍या लाखो लिटर पाण्याची बचत होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी दिली.

यावेळी पाणी पुरवठा माजी सभापती विठ्ठल चोपडे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनिल पाटील, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे, नितेश पोवार, सुभाष हावळ, इनामं चे अभिजित पटवा, उमेश पाटील यांच्या जलशुध्दीकरण केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post