देशाचे पंतप्रधान नरेंद मोदीजी यांच्या प्रयत्नातून देशभरामध्ये कोरोना लसीचे नियोजनबद्ध लसीकरण चालू आहे.





PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणारी *कोविशिल्ड लस इचलकरंजीतील आय.जी.एम. रुग्णालयात दाखल* झाल्यानंतर आज  लसीकरणास सुरुवात झाली. या *कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे* व *जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत  करण्यात आला. रुग्णालयात लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी केली असून न घाबरता ही लस घ्यावी, असे आवाहन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी यावेळी केले.

यावेळी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे , नगरसेवक सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, जि.प सदस्य प्रसाद खोबरे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारिख, कपिल शेटके,नितेश पोवार, रवी मोरे, डॉ. रवींद्र शेटे, डॉ. संदीप मिरजकर , डॉ. महाडिक , डॉ. शुभांगी रेडालकर आणि नर्स कम्पाउंडर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post