हुपरी : महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, यांच्या सह ऊर्जा सचिव , कार्यकारी संचालक महावितरण यांच्या विरोधात मानसिक क्लेश , फसवणूक , आर्थिक लुबाडणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री दौलत अण्णा पाटील यांनी आपल्या सर्व पदाधिकारी सहित हुपरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांचे कडे निवेदन देण्यात आले.



हुपरी :  महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, यांच्या सह ऊर्जा सचिव ,  कार्यकारी संचालक  महावितरण यांच्या विरोधात मानसिक क्लेश , फसवणूक , आर्थिक लुबाडणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी  मनसेचे हातकणंगले तालुका  अध्यक्ष श्री दौलत अण्णा पाटील यांनी आपल्या सर्व पदाधिकारी सहित हुपरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांचे कडे निवेदन देण्यात आले.

     कोरोना महा मारीच्या देशा सह संपूर्ण महाराष्ट्रात  २२ मार्च २०२० ते  ८ जुन २०२०  दरम्यान अत्यंत कठोर टाळेबंदी होती . या काळात  महा वितरण कडून वीज मीटर रीडिंग  साठी कोणीही आले नाहीत व वीज बिल देण्या साठी आले  नाहीत. अचानक महावितरण ने दुप्पट तिप्पट रकमेची वीज बिले पाठऊन  सर्वांच्या झोपा उडऊन टाकल्या. या वीज बिलांचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील जनतेसह शहरातील ग्राहकांना भोवळच आली. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कडे भरम साट  आलेल्या वीज बिलाबाबत असंख्य तक्रारी मांडण्यात आल्या त्याच बरोबर ऊर्जामंत्री  महावितरण चे प्रमुख अधिकारी अनेक बैठका घेण्यात आल्या लवकरच वीज बिल कपात करणे बाबत निर्णय  लवकर घेऊन नागरिकांना दिलासा देऊ असे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी दिले होते व या बाबतच्या बातम्या दैनिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.

   राज्याचे ऊर्जामंत्री आपल्या दिलेल्या शब्दाला जागतील असे वाटत होते, पण त्यांनी अचानक आपला पवित्रा बदलत  प्रत्येक ग्राहकाला वीज बिल भरावे लागणार असे फर्मान काढले. या निर्णयाने सर्वच  ग्राहकांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या  महिन्याच्या कालावधीतील आश्वासन विश्वास घाताचा घटनाक्रम  लक्षात घेतला तर जनतेची कशी आर्थिक फसवणूक करण्यात आली  आहे हे लक्षात येईल. राज्यातील जनतेला वीजबिलात कपात करू असे पोकळ आश्वासने देऊन त्यांना झुलवत ठेवण्याचे काम केलेले आहे.राज्यातील जनतेला वीज पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी  वीज बिलांची रक्कम वसूल करणे ही केवळ राजकीय  आश्वासनांची  फसवणू क नाही तर, वीज कंपन्यांशी संगनमत करून करण्यात आलेल्या जनतेची आर्थिक लूट आहे यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभीत  झाली असून त्यांना मानसिक आघात पोचलेला  आहे याची सर्व जबाबदारी आर्थिक लुबाडणूक, कट रचणारे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचेसह महावितरण चे प्रमुख अधिकारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करावा असे हुपरी  पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या  निवेदनावर मनसे हातकणंगले तालुका अध्यक्ष दौलतराव अण्णा पाटील,  महाराष्ट्रात, राज्य कार्यकारणी सदस्य राहुल हजारे,  हातकणंगले तालुका उपाध्यक्ष मोहन मेघे , हुपरी  शहर अध्यक्ष गणेश मालवेकर, हुपरी उपाध्यक्ष सयाजी बोधे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post