पशु पक्षाना

पशु पक्षांना अनैसर्गिक खाद्य देणे म्हणजे भूतदया नव्हे ! 

गिरीश मुरुडकर PRESS MEDIA LIVE : पुणे :

  'पशु पक्षांना अनैसर्गिक खाद्य देणे,त्यांच्या नैसर्गिक खाद्याच्या सवयी मोडणे म्हणजे भूतदया नव्हे',असे प्रतिपादन भारत फ्लॅग फाऊंडेशनचे अध्यक्ष  गिरीश मुरुडकर (झेंडेवाले) यांनी केले

इनरव्हील क्लब सटाणा आणि इनरव्हील क्लब मिल्क सिटी चाळीसगाव आयोजित ऑन लाईन  व्याख्यानात त्यांनी हे प्रतिपादन केले. 

गिरीश मुरुडकर म्हणाले,'पशु पक्षांना खाऊ घालताना,पुण्य करताना पाप होतेय का,भूतदया करताना पाप होतेय का हा विचार केला पाहिजे. अन्न मिळविण्यासाठी निसर्गाने पशू पक्षांच्या शरीरात रचना केलेली आहे,सवयी दिलेल्या आहेत. त्या सवयी मानवाकडून त्यांना अनैसर्गिक,कृत्रिम  अन्न देताना मोडल्या जातात आणि पशू पक्षांना  चुकीचे अन्न दिले जाते.आयते खाण्याची आणि पॅकेट बंद खाण्याची सवयी पर्यटन स्थळी,घाटात लावली जात आहे.त्यांची पचनशक्ती देखील बिघडवली जात आहे.पशु पक्षांच्या पुढील पिढयांना तयार,अनैसर्गिक अन्न खायच्या चुकीच्या सवयी लागत आहेत. 

स्वतःला सुखावण्यासाठी आपण वन्य प्राण्यांना,पक्षांना चुकीच्या सवयी लावत आहोत.मानवाच्या दयेवर जगायला शिकवत आहोत. परदेशात वन्य जीव,प्राणी,पक्षांना मानवी खायला घालण्यास मनाई आहे.भारतात मात्र सर्रास खायला घातले जाते. 

शहरात भूतदयेच्या नावाखाली कबुतरांची संख्या वाढत आहे. इतर पक्षी कमी होत आहेत.कबुतर खान्याजवळील रहिवाशांना फुफुसाच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.यामुळे पुण्याच्या,भूतदयेच्या  कल्पना तपासल्या पाहिजेत.गायी गुरांना कमी जागेत,तयार आहार देऊन,औषधे देऊन आपल्याला जास्त दूध आपण मिळवायला लागलो आहोत . 

कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांना केवळ चालविण्याचा व्यायाम पुरेसा नाही, त्याला पळायला,खेळायला संधी दिली पाहिजे,असेही मुरुडकर यांनी सांगितले. डोळसपणे आपण प्राणी,पशु,पक्षी यांच्या नैसर्गिक सवयी अभ्यासल्या पाहिजेत,पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही,त्यांचा अधिवास,झाडे जंगले राखुया असेही ते म्हणाले .  रुपाली जाधव  इनरव्हील क्लब सटाणा आणि मनीषा पाटील इनरव्हील क्लब मिल्क सिटी चाळीसगाव यांनी स्वागत केले.                                               

Post a comment

0 Comments