कोंढवा ॲमेझॉन कार्यालय तोडफोड प्रकरणात आठ जणांना अटक.

 कोंढवा ॲमेझाॅन कार्यालय तोडफोड प्रकरणात आठ जणांना अटक.




PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :


 वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान द्यावे, या मागणीसाठी कोंढवा भागातील ॲमेझाॅनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणत सोमवारी रात्री उशिरा अटक केलेल्या आठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमित अशोक जगताप (वय 40), सौरभ दीपक टिळेकर (वय 22), रोहित शाहू सोनावणे (वय 30), मयूर प्रकाश जगताप (वय 27) आकाश साधू आवटे (वय 24), अक्षय सुरेश जगताप (वय 25) मयूर शांताराम चव्हाण (वय 28) आणि निखिल शांताराम जगताप (वय 27, सर्व रा. कोंढवा बुद्रूक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विजय ओंकारनाथ तेलंग (वय 43, रा. शंकरशेठ रस्ता) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. रुपाली-पाटील ठोंबरे यांनी बाजू मांडली. नो मराठी नो ॲमेझॉन’ ही ऑनलाइन मोहीम गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून राबविण्यात येत आहे. सुरवातीला ॲमेझॉनकडून मनसेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मनसेने मुंबईत ॲमेझॉनविरोधात जाहिरातीचे फलक लावले.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने नोटीसही बजावली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी नुकतीच ॲमेझॉनच्या कोंढवा येथील कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणातील आठ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. पाटील करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post