शाहपुरात क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरू होणार

 इचलकरंजी येथील शहापूरात केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरू होणार.PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

वस्त्रनगरीबरोबरच क्रीडापंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी येथील शहापूरात केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अंतर्गत उभारण्यात येणार्‍या क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर  स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई)चे राज्यातील अधिकारी संजय मोरे यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी करुन माहिती घेतली. त्यामुळे आता या क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला गती मिळणार असून हे काम तातडीने व्हावे यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब यांचा पाठपुरावा सुरु आहे.*

Post a comment

0 Comments