केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार.

PRESS MEDIA LIVE : 

मुंबई दि. 21 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ; बहुजनांचे संघर्षनायक ; केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांचा दि. 25 डिसेंबर रोजी वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस रिपाइं तर्फे दरवर्षा प्रमाणे याही वर्षी संघर्षदिन म्हणून देशभर लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. 

 केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे बहुजनांचे संघर्षनायक नेतृत्व आहे.संघर्षाचे दुसरे नाव रामदास आठवले आहे. कोरोनाच्या संकट काळात ना रामदास आठवले यांनी दिलेला गो कोरोना ; कोरोना गो चा नारा जगभर प्रसारित झाला. कोरोना विरुद्ध लढण्याची; संघर्ष करण्याची हिम्मत  प्रेरणा देणारा नारा ठरला. गरिबांना ; शोषितांना; पीडितांना न्याय हक्का साठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे संघर्षनायक नेतृत्व म्हणून रामदास आठवले संपूर्ण देशात लोकप्रिय आहेत.त्यामुळे संघर्षनायक  रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे दरवर्षी संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होतो. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात  तसेच दिल्ली; आसाम ; कर्नाटक; गोवा; पोंडीचेरी; केरळ;कलकत्ता ; हैद्राबाद; भोपाळ; इंदूर; राजस्थान; अहमदाबाद; सुरत;  धनबाद;विलासपूर; पाटणा ;आदी अनेक शहरात देशभर ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त गरिबांना अन्नधान्य वाटप; रुग्णांना फळवाटप; गरिबांना कपडे वाटप। चादर वाटप; तसेच आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर आदी लोकपोयोगी उपक्रम राबवून रिपाइं तर्फे देशभर येत्या 25 डिसेंबर रोजी संघर्षनायक ना रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा होणार आहे. अशी माहिती रिपाइं चे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे. 



             

Post a Comment

Previous Post Next Post