AdSense code जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखानाजवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी : 

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची *31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा* *माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब* यांच्या उपस्थितीत पार पडली. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासन नियमांचे पालन करुन ही सभा घेण्यात आली. सभेसाठी येणार्‍या प्रत्येक सभासदाचे थर्मल स्कॅनिंग करुन आत सोडले जात होते. सभास्थळी सोशल डिस्टन्सनुसारच बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा *‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’* असा नामविस्तार करण्यास झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत मंजूरी देण्यात आली. त्याचबरोबर कारखान्यात *इथेनॉल निर्मितीला प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.* इथेनॉल निर्मितीनंतर बाहेर पडणार्‍या स्पेंटवॉशमधून पोटॅश खत तयार करण्यात येणार आहे.

Post a comment

0 Comments