AdSense code डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.


 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेती उद्योग विषयक विचार अतिशय महत्त्वाचा आहे. 

समाजवादी प्रबोधिनीचे अभ्यासू कार्यकर्ते देवदत्त कुंभार.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी ता.६  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेती, अर्थकारण , बँकिंग,पाणी व्यवस्थापन, उद्योगधंदे ,धम्म ,धर्म, समाजव्यवस्था,जातीयता  यासह विविध विषयांवर  समाजातील शेवटचा माणूस केंद्रबिंदू ठेवून जे विचार मांडले  त्याचे समकालीन महत्व  मोठे आहे. आज केंद्र सरकारच्या शेती व कामगार धोरणाविरोधी जे  आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर डॉ.आंबेडकरांचा शेती व उद्योग विषयक विचार अतिषय महत्वाचा आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे अभ्यासू कार्यकर्ते देवदत्त कुंभार  यांनी व्यक्त केले.ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त आयोजित व्याख्यानात ' डॉ.आंबेडकर यांची विचारधारा ' या विषयावर बोलत होते.समाजवादी प्रबोधिनी  व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान अयोजित केले होते.अध्यक्षस्थानी प्रसाद कुलकर्णी होते. प्रारंभी अशोक केसरकर यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. देवदत्त कुंभार यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारधारेची सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी केली.

       अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, पिचलेल्या ,दबलेल्या माणसाचे उत्थान आणि त्यासाठी  समाजकारण-राजकारण - अर्थकारण हे  आंबेडकरांचे जीवनध्येय होते. त्यांच्या सर्व लेखन भाषणातून त्याची प्रचिती येते.त्यामुळे समाजातला शेवटचा माणूस सर्वार्थाने सुखी होईल तोपर्यंत आंबेडकरांची विचारधारा सार्वकालिक सुसंगत ठरते.यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे,अन्वर पटेल, राजन मुठाणे, सचीन पाटोळे,दयानंद लिपारे, मनोहर जोशी, शकील मुल्ला, अरविंद नेतले,संजय कांबळे आदींची उपस्थिती होती. अन्वर पटेल यांनी आभार मानले.

फोटो : डॉ.आंबेडकर यांची विचारधारा या विषयावर बोलताना  देवदत्त कुंभार सोबत  प्रसाद कुलकर्णी

Post a comment

0 Comments