ग्राहक पंचायत

 ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा इचलकंजी.


PRESS MEDIA LIVE 


 वार्ताहर:-  साप्ताहिक सभा संपन्न ग्राहक पंचायत शाखा, इचलकंजीच्या वतीने आयोजित मिटींग मध्ये इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष श्री सुरेंद्र दास सर यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आढावा घेण्यात आला सरांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये गॅस वितरण संदर्भात दिले प्रांताधिकार्‍यांना निवेदन संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच ग्राहकांच्या समस्या त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे आहेत व गॅस एजन्सी वाल्यांचे चे भ्रष्टाचार व गॅस टाकी पोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समस्या व गॅस टाकी तील गॅस काढून घेणे परस्पर गेस्ट क्या बाहेर विकणे वेळेवर गॅस टाकी न आणून देणे ग्राहकाकडून जादा पैसे मागणी व एका टाके मागे वितरकाला मिळणारे पैसे त्या कर्मचाऱ्याला देत नाहीत इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आपण या समस्या सोडवत असताना कोण कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे व त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. 

तसेच इचलकरंजी ग्राहक पंचायतच्या बोर्डाचे अनावरण व ऑफिसचे उद्घाटन करण्यासंदर्भात तारीख जाहीर करणे. डिजिटल बोर्ड तयार करून घेणे. दि.24 डिसेंबर हा ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण ग्राहक सप्ताह साजरा करणे व कोल्हापूर येथे दि.24/12/2020 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहणे. त्याचबरोबर  कोरोना काळात ज्या ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी व  डॉक्टर, नर्सने अनमोल असे योगदान दिले त्यांना आपल्या ग्राहक पंचायत च्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करणे इत्यादी विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली या मीटिंगला उपस्थित उपाध्यक्ष ठोमके साहेब, संघटक पारीक, शिरदवाडे,  साळुंखे साहेब, सचिव सरवडे, लायकर, मुरतले सर,इंगळे,शिंपी, हरीअर मॅडम,कोळी सर, गेजगे. मोरे इत्यादी मान्यवर सदस्य उपस्थित होते. व शेवटी आभार साळुंखे साहेब यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post