पुणे : सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदीमहापालिका प्रशासनाकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणस बंदी घातली आहे

. PRESS MEDIA LIVE :. पुणे मोहम्मद जावेद मौला : 

पुणे - राज्यात फटाके बंदी नसली, तरी फटाक्यांच्या धुरामुळे होणारे संभाव्य प्रदूषण आणि त्यामुळे करोना रुग्णांना होऊ शकणारा त्रास लक्षात घेऊन अखेर महापालिका प्रशासनाने शहरात सार्वजनिक ठिकाणी फटके वाजविण्यास बंदी घातली आहे. त्यात मोकळी मैदाने, शाळांची मैदाने, पर्यटनस्थळे, उद्यांचा समावेश आहे. सोबतच, करोनाची स्थिती लक्षात घेऊन पुणेकरांनी इतर ठिकाणी फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा, अथवा टाळावेत असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

शहरात सध्या करोनाची साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र, फटक्यांच्या धुरामुळे करोनामुक्त नागरिकांच्या श्वसनसंस्थेला धोका होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे यंदा फटाकेमुक्त आणि प्रदूषणरहीत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. तर देशात पाच राज्यांनी फटक्यांवर बंदी घातली आहे. तर, महाराष्ट्रात फटाके विक्रीस मुभा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत.

त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. करोना काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीप्रदूषण होते. याचे परिणाम अनेक दिवस दिसून येतात. त्यामुळे शक्य तो कमी धुराचे आणि आवाज होणार नाही अशा फटाक्यांचा वापर करावा, असे आदेशात म्हटले आहे

महापालिका, पोलिसांवर  जबाबदारी.

दिवाळीत सार्वजनिक फराळ आणि दिवाळी पहाट यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कचा वापर न करणे, विना परवाना कार्यक्रमांचे आयोजन केल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशासनाने सूचना दिल्या असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने या कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Post a comment

0 Comments