आमदार प्रकाश आण्णा आवाडे.आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरणाचे काम सुरू.

वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

 इचलकरंजी-कबनूर या मार्गावरील अत्यंत दूरवस्था झालेल्या 300 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पाठपुरावा केला. या कामाची आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली* . खड्डेमय रस्त्याची सुधारणा होऊ लागल्याने नागरिकांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी-कोल्हापूर या शहरांना जोडणारा अतिग्रे-कबनूर-इचलकरंजी हा राजमार्ग 200 रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र इचलकरंजी शहराची हद्द संपल्यानंतर ते कबनूरपर्यंत 300 मीटर रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाली होती. जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. शिवाय लहान-मोठे अपघात तर नित्याचेच बनले होते. या संदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करुन हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यासह त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानुसार अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची सुरुवात झाली असून *आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सोमवार दि. ०९-११-२०२० रोजी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत माहिती घेतली* . त्यावेळी येणार्‍या-जाणार्‍या वाहनधारकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.Post a comment

0 Comments