AdSense code खंडाळा (रत्नागिरी) येथे भव्य वॉलीबॉल ( शूटिंग )स्पर्धा उत्साहात संपन्न

खंडाळा (रत्नागिरी) येथे भव्य वॉलीबॉल ( शूटिंग )स्पर्धा उत्साहात संपन्न

 खंडाळा (रत्नागिरी ) येथे भव्य व्हालीबाॅल (शूटिंग ) स्पर्धा उत्साहात संपन्न.

 PRESS MEDIA LIVE :. रत्नागिरी : 

सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने जनजागृती उपक्रम म्हणून जयगड सागरी पोलिस ठाणे तसेच खंडाळा क्रिकेट व व्हालीबाॅल क्लब खंडाळा यांच्या वतीने भव्य व्हालीबाॅल (शूटिंग ) स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. खंडाळा व्हालीबाॅल व क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, माजी समाजकल्याण सभापती तसेच महाराष्ट्र राज्य शुटींग बाॅल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मा.शरदजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भव्य स्पर्धेचे उद्घाटन जयगड सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.नितीनजी ढेरे साहेब , पोलिस मा.संदिपजी साळवी, वाटद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा. बापूशेठ घोसाळेे, सामाजिक कार्यकर्ते मा.भाई जाधव, हाॅटेल एकदंत गणपतीपुळे चे मालक मा.विनोदशेठ चौगुले, पोलिस मित्र सचिन वीर, तसेच सर्व खेळाडू व क्रीडा प्रेमी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेत परिसरातील बहुसंख्येने संघ सहभागी झाले होते. या स्पर्धे दरम्यान *महाराष्ट्र राज्य शुटींग बाॅल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मा. शरदजी चव्हाण, रत्नागिरी जिल्हा शुटींग बाॅल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मा. बापूशेठ घोसाळे, मा.निनादशेठ चौगुले यांचा सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.नितीनजी ढेरे साहेब यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सैतवडे येथे झालेल्या शुटींग बाॅल स्पर्धेतही मा.शरदजी चव्हाण, मा.बापूशेठ घोसाळे तसेच मा.विनोदशेठ चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातून भविष्यात महाराष्ट्र राज्य शुटींग बाॅल संघात एक तरी खेळाडू खेळावा यासाठी या परिसरात शुटींग बाॅल खेळासाठी पुरक असे वातावरण निर्माण करण्याचा मानस यावेळी मा.शरदजी चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.भविष्यात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, तसेच राज्यस्तरीय शुटींग बाॅल स्पर्धेचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीही मा.शरदजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय शूटिंग बाॅल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.आजच्या या स्पर्धेत खंडाळेश्वर -अ संघ विजेता  तर खंडाळेश्वर -ब संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.नितीनजी ढेरे साहेब, मा.शरदजी चव्हाण, मा.बापूशेठ घोसाळे, मा.विनोदशेठ चौगुले, मा.भाई जाधव, मा.अशोकराव विचारे तसेच सर्व खेळाडू व क्रीडा प्रेमी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयगड पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस, खंडाळा क्रिकेट व व्हालीबाॅल क्लबचे सर्व सदस्य तसेच  श्री.यादव बलेकर, दिपक सावंत, रामदास खेडेकर, बिपिन विचारे सर यांनी विशेष मेहनत घेतली. उद्घाटन व बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस्.के.जाधव सर तर स्पर्धेचे धावते समालोचन एस्.के.जाधव सर व बिपिन विचारे सर यांनी केले .स्पर्धेचे पंच म्हणून संदिप वझे, प्रमोद सावंत, अविनाश केदारी, दिलीप झगडे,सुशिल वझे, विवेक वझे, निरज पवार, बिपिन विचारे यांनी काम पाहिले.

Post a comment

0 Comments