लोकजनशक्ती पार्टीची मागणी



रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा : लोक जनशक्ती पार्टीची  मागणी.


३ नोव्हेंबर रोजी विभागीय कार्यालयावर संघर्ष मोर्चा

PRESS MEDIA LIVE :  पुणे :

 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी , शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी , सर्व रेशनिंग दुकानदार यांची न्यायालयीन समिती नेमुन चौकशी करून दोषी वर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

या मागणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी ११ वाजता  पुणे विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.डॉ. आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा संघर्ष मोर्चा निघणार आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला

लोक जनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा -  अध्यक्ष   संजय आल्हाट ,

प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे , पुणे शहर जिल्हा  प्रवक्ता के.सी.पवार  ,संजय चव्हाण, अप्पासाहेब पाटील, एड. अमित दरेकर उपस्थित होते.

संजय आल्हाट म्हणाले, 'पुणे शहर व पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी व सर्व परीमंडळ अधिकारी यांनी केंद्रसरकारचे संकेत डावलून मोफत धान्य वितरणाचे सेंटर उभे न करता हे काम रेशनिंग दुकानदारावर सोपवून  भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सी.बी.आय मार्फत चौकशी करण्यात यावी.

सर्व रंगाच्या पांढऱ्या . पिवळया व केशरी शिघापत्रिकेवर असलेली उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी. व त्यांना विकत अथवा मोफत कायमस्वरुपी अन्नधान्याचा कोठा मंजूर करण्यात यावा व त्याचे वाटप करण्यात यावे.

रेशनिंग दुकानदाराने आपल्या विभागातील शिधापत्रिका धारकाची आधार कार्ड ची जोडणी स्वता करुन द्यावी व थंब ( अंगठा )जरी आधार कार्डला जोडला गेला नाही तरी शिधापत्रिकेला प्रमाण माणून त्यास धान्य देण्यात यावे

पुणे शहर व पुणे जिल्हयातील सर्व दुकानदारांनी मोफत आलेल्या अन्नधान्याचा साठा ज्या शिधापत्रिके धारकांना व आधार कार्ड असणान्या मजुरांना व ज्यांच्याकडे शिधापत्रिका व आधार कार्ड नाही त्यांचा मोबाईल नंबरवर व मोबाईल नसेल तर त्याच्या फोटोवर जे धान्य वाटप केलेले आहे. त्याची यादी जाहीर करून त्याची एक प्रत आम्हास देण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

 पुणे शहरातील ज्या गोरगरिब नागरिकांना ज्यांची शिधापत्रिका असताना सुद्धा व त्यांना परिस्थिती माहित असताना धान्य वितरण केले नाही,त्या सर्व दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावे. व त्याच बरोबर संबंधित सर्व परिमंडळ अधिकारी व सर्व रेशनिंग इनिस्पेक्टर तालुका पुरवठा अधिकारी , जिल्हा पुरवठा अधिकारी व शहर पुरवठा अधिकारी यांच्या वर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. सदरहू मोफत अन्नधान्य वाटपाचा पहिल्या टप्प्यातील तकारी आजच्या लोक जनशक्ती पार्टी संघर्ष मोर्चाच्या वतीने सर्व तक्रारदारासह आपल्याला सादर करण्यात येत आहे. जर याप्रकरणी प्रशासनाने या बाबी गांभिर्यपुर्वक जर दखल घेतली नाही. तर लोक जनशक्ती पार्टी च्या वतीने मुंबई येथे मंत्रालयावर जन आंदोलन करण्यात येईल व त्यातूनही जर सरकारने न्याय दिला नाही तर संसद भवना समोर निदर्शनेवर करण्यात येतील . पंतप्रधानाला या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर निवेदन सादर करण्यात येतील या सर्व गोष्टीस आपण जबाबदार असाल याची गांभिर्याने दखल घेण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post