न्यू पुणे केट्रींग असोसिएशन च्या वार्षिक सभेत धोरणां त्मक निर्णय.


न्यू पुणे केटरिंग असोसिएशन च्या वार्षिक सभेत धोरणात्मक निर्णय

न्यू पुणे केटरिंग असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड


केटरिंग व्यवसाय सावरण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज : जी.एस.बिंद्रा.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

न्यू पुणे केटरिंग असोसिएशनची वार्षिक सभा सोमवारी सायंकाळी यश लॉन येथे पार पडली.न्यू पुणे केटरिंग असोसिएशन च्या वार्षिक सभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले

बिंद्रा हॉास्पिटॅलिटी केटरिंग चे प्रमुख जी.एस.बिंद्रा, किशोर सरपोतदार,सुरेश माळी, सनी औसरमल,   कालूराम गहलोत , बाबु सिंह राजपुरोहित, निखिल मालानी,    जेडी सर, समीर ठाकूर  व्यासपीठावर उपस्थित होते.

.न्यू पुणे केटरिंग असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुरेश माळी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.जे डी सर, मनोहर गौड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मनोज वैष्णव ( सचिव ), प्रताप राठोड, दशरथ राजपुरोहित ( सहसचिव ), कुणाल परदेशी ( कोषाध्यक्ष ), दिलीप राजपुरोहित, जितेंद्र राठोड, ( सहकोषाध्यक्ष ) यांची निवड करण्यात आली.जी.एस.बिंद्रा, किशोर सरपोतदार,कालूराम गहलोत , बाबु सिंह राजपुरोहित, निखिल मालानी सल्लागार म्हणून नव्या कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

ही नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे.

जी.एस.बिंद्रा म्हणाले, 'दिवाळीत कामगारांना सांभाळण्याची ताकद मिळावी कारण केटरिंग व्यवसाय संकटातून जात आहे. नव्या कार्यकारिणीला सर्वांनी सहकार्य करावे. केटरिंग व्यवसायाला प्रतिष्ठा मिळावी, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.

छोट्या केटरिंग व्यावसायिकांना भांडवलासाठी सुलभ कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. कोरोना काळात सुरक्षिततेची जबाबदारी व्यावसायिक घेतील. बुफे पेक्षा वाढपी पद्धत सुरक्षित आहे. त्यात मनुष्यबळ वाढते, पण आता सुरक्षितता महत्वाची आहे. या व्यासपीठावर दरपध्दती, मानधन निश्चित करून स्पर्धेने होणारे नुकसान टाळावे.व्यवसाय सर्वांना मिळेल, काळ बदलेल , काळजी करू नये.कामगारांना सर्व केटरिंग व्यावसायिकांनी गावी पाठवले आहे. ते परत येण्यास वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

सनी औसरमल म्हणाले, 'पुणे ही अतिथ्यशीलतेची राजधानी आहे. हा लौकिक सर्वांनी जपावा. सर्व सरकारी पातळयावर केटरिंग व्यावसायिकांचे प्रश्न सोडवले जातील.

किशोर सरपोतदार म्हणाले, ' महिन्यातून एकदा सर्व व्यावसायिकांनी एकत्र जमून अडीअडचणी सोडवाव्यात. कठीण काळावर मात करण्यासाठी मनोधैर्य राखावे.

नुतन अध्यक्ष सुरेश माळी म्हणाले, ' केटरिंग व्यवसायाच्या अडचणी असंघटितपणामुळे आहेत. अध्यक्षपदाच्या ३ वर्षाच्या काळात या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

समीर ठाकूर म्हणाले, ' अशिक्षित माणसांनाही रोजगार देणारा हा व्यवसाय आहे.कोरोना काळात अन्नाची किंमत कळली. अन्न वाया जाऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी.केटररकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने, बँकांनी बदलावा. त्यासाठी केटरिंग क्षेत्राने संघटित व्हावे. सेंट्रल किचन, गोडावूनचा विचार करावा. हॉल, कार्यालय येथे ग्राहकाची अडवणूक होते.कमिशनमुळे केटररला पैसे कमी मिळतात, याकडे ही लक्ष दिले पाहिजे.

मनोज वैष्णव यांनी आभार मानले. तरुण मोदी यांनी सूत्रसंचालन केले

Post a Comment

Previous Post Next Post