गणित ही अखंड शोध यात्रा.

 

पाठांतराचे संस्कार' या विषयावरील २ दिवसीय वेबिनारला प्रारंभ                                                                                                                                   गणित ही अखंड शोधयात्रा :मंदार नामजोशी

P RESS MEDIA LIVE: पुणे :

'इतर विषयांप्रमाणे गणित विषयाची उत्तरे त्याच पानावरील परिच्छेदात दिलेली नसतात, गणिताची उत्तरे गणित सोडवून शोधायची  असतात. त्यासाठी  विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती जागी केली पाहिजे.पाठांतराद्वारे पाढे पाठ करून गणिताची भीती घालवली पाहिजे.एकंदरीतच गणित ही अखंड शोधयात्रा आहे' असे प्रतिपादन मंदार नामजोशी यांनी केले. 

  गणिताची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या 'अंकनाद' या ऍप तर्फे  'पाठांतराचे संस्कार' या विषयावर २ दिवसीय विनामूल्य  वेबिनार ला शनिवार,७ ऑक्टोबर २०२० रोजी प्रारंभ झाला.सकाळी ११ वाजता 'अंकनाद'ऍप चे  प्रणेते मंदार नामजोशी यांनी 'संगीतबद्ध पाढे पाठांतर प्रणाली' या विषयावर मार्गदर्शन केले.  


मंदार नामजोशी म्हणाले,'विद्यार्थ्यांच्या कानावर काय पडावे याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. घोकंपट्टी आणि पाठांतराचा संस्कार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अपूर्णांकाचे पाढे ही संकल्पना जगात कोणत्याही भाषेत नाही. हे अपूर्णांकाचे पाढे मराठी भाषेत आहेत,ते जगभर नेण्याचा प्रयत्न आम्ही 'अंकनाद' या ऍप तर्फे करीत आहोत.पाढे पाठांतर स्पर्धा आणि गणितालय या संकल्पनांची माहिती मंदार नामजोशी यांनी दिली. 

प्राची साठे म्हणाल्या,'गणित ही आपली परंपरा आहे,पावकी,निमकी,सवायकि सारखे पाढे हा आपला ठेवा आहे.ती जपली पाहिजे.त्यासाठी कृतियुक्त शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे.'  ८ ऑक्टोबर २०२०, रविवारी  सकाळी ११ वाजता इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थचे  संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी हे 'पाठांतराचे संस्कार' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

https://zoom.us/j/99038383489... या लिंक वरून सहभागी होता येईल. 

मिटिंग आय डी  990 3838 3489 असा असून  991203 हा पासकोड आहे. 

हा  वेबिनार 'अंकनाद' च्या फेसबुक पेजवर जाऊन लाईव्ह पाहू येणे शकय आहे

त्यासाठी  https://www.facebook.com/Aankanaad   या  लिंक वरून सहभागी होता  आहे.


Post a Comment

Previous Post Next Post