केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले यांची कोरोना मात.


केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले  यांची कोरोनावर मात -गौतम सोनवणे

रविवारी ना.रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले  घरी परतणार असल्याने रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करणार

PRESS MEDIA LIVE :

मुंबई दि. 7 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई आठवले यांनी  कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. उद्या रविवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता  ना. रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले  रुग्णालयातून घरी परतणार आहेत.  संघर्षनायक बहुजनांचे  लोकनेते ना. रामदास आठवले यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांनी कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन स्वागत करीत रिपाइं कार्यकर्ते उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा करणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. 

केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी  दि. 20 फेब्रुवारी रोजी गो कोरोना चा नारा दिला होता. त्यांनी दिलेला गो कोरोनाचा नारा जगभर लोकप्रिय नारा ठरला आहे. आजही कोरोना विरुद्ध लढण्यास गो कोरोनाचा नारा प्रेरणादायी ठरत आहे. मात्र गो कोरोनाचा नारा देणाऱ्या ना. रामदास आठवले यांनाच कोरोना ने घेरले. दि. 27 ऑक्टोबर ला ना रामदास आठवले यांचा आणि सौ सीमाताई आठवले यांच्या  कोरोना  चाचणीचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हा पासून आठवले दाम्पत्य  खाजगी  रुग्णालयात दाखल होते. 11 दिवस यशस्वी उपचार करून कोरोनावर ना रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले  यांनी  मात केली आहे. उद्या रविवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ना.रामदास आठवले बांद्रा येथील संविधान निवासस्थानी परतणार आहेत. कोरोनावर आपल्या नेत्याने मात  केल्याचा आणि त्यांची प्रकृती ठणठणीत चांगली असल्याचा आनंद रिपाइं कार्यकर्ते स्वयंस्फूर्तपणे साजरा करतील अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.           

Post a comment

0 Comments