केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.


         

एनडीए ला पुन्हा बहुमत दिल्याबद्दल बिहार च्या जनतेचे अभिनंदन - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले.

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई दि. 10 - बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधन ने नितीशकुमार आणि एनडीएवर प्रचंड टीका  केली मात्र त्यांना बिहार च्या जनतेने नाकारले असून  एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ; मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप चे सुशीलकुमार ; देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी मेहनत घेऊन प्रचार केला. बिहार च्या विकासासाठी जनतेने एनडीए ला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा संधी दिल्याबद्दल बिहार च्या जनतेचे  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी  हार्दिक आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासाठी देशाच्या विकासासाठी चांगले काम करीत आहेत. त्यामुळे आम जनतेचा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दृढ असल्याने बिहार च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिश्मा दिसला. तसेच बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागील 15 वर्षांत बिहार चा नेत्रदीपक विकास केला आहे. त्यामुळे भाजप जेडीयु प्रणित एनडीए ला बिहार मध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. जनतेने पुन्हा पुढील 5 वर्षांत 

बिहार चा विकास व्हावा यासाठी बिहार च्या  जनतेने एनडीए ला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले. 

बिहार मध्ये बुद्ध गया येथे तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.।संपूर्ण जगाला शांततेचा अहिंसेचा बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा उगम बिहार मध्ये झाला असल्याने बिहार बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्या बिहार च्या विकासाची जबाबदारी जनतेने पुन्हा एकदा एनडीए वर दिली असल्याबद्दल बिहार च्या जनतेचे आपण आभार मानत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले. 


           

Post a comment

0 Comments