गीता संघर्ष न्यूज .

 इचलकरंजी  येथे राष्ट्रीय प्रेस दिन आणि गीता संघर्ष न्यूज चा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

युट्युब चॅनेला सरकार कडून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. संपादक मेहबूब सर्जे खान.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजी : राष्ट्रीय प्रेस दिन आणि गीता संघर्ष न्य ज चा  दुसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शेळके, युवराज मोरे या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांची उपस्थित हो ती.  या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वृत्तपत्र क्षेत्रातील नामांकित संपादक विश्वास कांबळे (दलित मित्र)  विजय फडतारे (संपादक ग्रामदैवत)  शिवकुमार मूरतले , हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून प्रेस मीडिया व लाईव्ह चे संपादक मेहबूब सर्जे खान होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात मेहबूब सर्जे खान यांनी यूट्यूब चैनल ला सरकारकडून मान्यता मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. हा सर्व कार्यक्रम अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.

  वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी राज्यस्तरीय गीता संघर्ष गुनिजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . तसेच को रो ना कालावधीत कार्य केलेल्या मान्यवरांना देखील जागृत युद्ध म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा देखील गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

  या कार्यक्रमाचे नियोजन गीता संघर्ष न्यूज चैनल चे संपादक गणेश पाखरे व  सौ.गीता पाखरे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात सर्व थरातील व विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून व मानपत्र देऊन सन्मान केला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानले.Post a comment

0 Comments