महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची सरस्वती.


 “महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची सरस्वती' म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या सौ सीमा अनिल इंग्रोळे याना या सन्मानामुळे अखंड महाराष्ट्र भर नाव झाले आहे. 

अत्यंत अडचणीतून मार्ग काढत व करोनाचे महासंकट असल्याने स्पर्धेच्या  ठिकाणी पोहोचण्यासाठी अनंत अडचणी आल्या त्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीला मला मुकावे लागले, पण देवाची साथ व आपले सर्वांचे प्रेम यामुळे त्या स्पर्धेत मला यश मिळाले.

महाराष्ट्राची सौभ्याग्यवतीची अंतिम स्पर्धा २५ नोव्हेंबर, २०२० रोजी महाबळेश्वर येथे पार पडली. या स्पर्धेच्या वेळी आपण सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम आणि आशीर्वाद देवून मला यशस्वी केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आभार मानते. मी या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर माझे सर्व फेसबुक मित्र आणि फॅमिली, माझे सर्व मित्र आणि मैत्रिणीची टीम, खासकरून बाबा बागने, विकास, शकील यांनी मला खूपच प्रोसाहित करून मला काही अडचण असेल तर ती सोडवण्यात खूपच साथ दिली आहे त्यांचेही मी आभारी आहे.  त्याचप्रमाणे हुपरी समाचार चे संपादक श्री वसंत पाटील आणि दैनिक हिंदूसम्राट यांचीही मी ऋणी आहे. त्यांनी त्यांच्या हजारो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते,

 माझे इंग्रोळे आणि पाटील परिवार, माझे दीर श्री सुरेश इंग्रोळे यांची मला नेहमीच साथ असते त्याबद्दल त्यांचेही आभार. शेवटी माझा बेस्ट मित्र माझा नवरा अनिल आणि मुलगी आसावरी यांनी तर माझ्याबरोबर प्रत्येक क्षण आम्हीहि त्याच स्पर्धेत भाग घेत आहेत अशीच मला साथ दिली असे शेवटी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post