पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस.

 पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस; शहरासह जिल्ह्यातही  थैमान.

PRESS MEDIA :

आधीच कोरोनाचे संकट गंभीर असताना त्यातच पाऊस थांबण्याची काहीच चिन्हे नाहीत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या होत्या. तसेच चित्र पुणेकरांना आजही अनुभवायला मिळाले आहे. पुण्यात बुधवारपासून सुरू झालेल्या

पावसाने गुरुवारी सकाळीही जराशीही उसंत घेतलेली नाही. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. परतीच्या पावसाचा अक्षरशः कोथरूड, श्रीमंत दगडूशेठ गणपती, बिबवेवाडी, शहरातील पेठा, उत्तमनगर - शिवणे, मध्यवर्ती भागात रात्री नंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. नदी-नाले खळखळून वाहत आहेत. हवामान विभागाने आजही पुण्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणेकरांना सावध होण्याची वेळ आली आहे.

आधीच कोरोनाचे संकट गंभीर असताना त्यातच पाऊस थांबण्याची काहीच चिन्हे नाहीत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या होत्या. तसेच चित्र पुणेकरांना आजही अनुभवायला मिळाले.

सतत पडणाऱ्या कोसळधार पावसाने पुणेकरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यंदा पावसाळ्यात अशा प्रकारचा पाऊस झाला नव्हता. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. धरणांत १०० टक्के पाणीसाठा असल्याने मुठा नदीतून पाणी सोडण्यात येत आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे.

             शहरासह जिल्ह्यात पावसाचा कहर

शहरातील अनेक भागातील घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पाऊस कोसळला. जिल्ह्यातील इतर धरणे काठोकाठ भरली. पुणे सोलापूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

पुणे वेधशाळेकडील नोंदीनुसार बुधवारी रात्री पर्यंत ९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि उपनगरात दुपारनंतर हळू हळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते नऊच्या सुमारास पावसाच्या सरींनी जोर धरल्यानंतर काही वेळातच रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. शहरातील सखल भागांत पाणी साचले तर अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली. आंबिल ओढ्यालगत असलेल्या टांगेवाला कॉलनी, गुरुराज सोसायटी, ट्रेझर पार्कसह आदी भागात पाणी शिरले. टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विद्या विकास शाळेत हलविण्यात आले आहे. पाणी शिरल्याच्या ९० तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या आहेत.

बिबवेवाडी, सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर ,लक्ष्मीनगर शाहू वसाहत , मार्केटयार्ड ,आनंदनगर ,महर्षी नगर भागातील घरात पाणी शिरले. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस कोसळला. खडकवासला धरणक्षेत्रात १३७ मिमी, पानशेत (९७),वरसगाव (९४)आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील उजनी धरणातून सव्वा दोन लाख क्युसेक इतके पाणी सोडले जात आहे. इतर धरणे तुडुंब भरली आहेत.

परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यात बुधवारी (दि. १४) दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक रस्त्यावरून पाणी वाहत होते. खबरदारीचा भाग म्हणून पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली होती. पावसाचा जोर ओसरताच पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. सुरू आहे.

Post a comment

0 Comments