शेवटी अनंत काळासाठी डोळे मिटले  

आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले वडिलांचे डोळे शेवटी अनंत काळासाठी मिटले.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

        पुणे 1 ऑगस्ट 2012 रोजी जंगली महाराज येथे साखळी बॉम्बस्फोट झाला. पुणे नांदेड औरंगाबाद येथून काही मुस्लिम तरुणांना त्या बॉम्बस्फोटात अटक करण्यात आली.
पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या फॅशन डिझायनर टेलरिंगचा काम करणारा व्यवसायिक फिरोज सय्यद व त्यांच्यासोबत फारुक बागवान,मुनिब मेमन यांना संशयित आरोपी म्हणून अटक झाली. त्या दिवसा पासून तर आज रोजी पर्यंत हे सर्व आरोपी तुरुंगात जेरबंद आहे.

      मा.सुशील कुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर देशातील त्यांची हे प्रथम भेट पुण्यात होती. त्यादिवशी जंगली महाराज येथे बॉम्बस्फोट झाल्याने सदरचा दौरा रद्द करण्यात आला.

महाराष्ट्र एटीएस सदर बॉम्बस्फोटाचा तपास करीत असताना अचानकपणे दिल्ली स्पेशल सेलचे काही अधिकारी पुण्यात दाखल झाले.व जंगली महाराज बॉम्बस्फोटांचा छडा लागला आहे अशी माहिती देऊन वरील तरूणांना अटक करुन दिल्ली येथे घेऊन गेले. 

फिरोज सय्यद फॅशन डिझाईनर तरुण मुलगा पुणे कॅम्प येथे एका भाड्याच्या दुकानात त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले व हळूहळू आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत होता. पुण्यात प्रसिद्ध असलेला टेलर व शांत स्वभावाचा
असलेला फिरोज बॉम्बस्फोट करू शकतो असे कुणालाच वाटत नव्हते. ज्या दिवशी स्फोट झाला तो रमजान महिन्याचा पवित्र दिवस होता.स्फोट होत असताना तो आपल्या दुकानात सोबत काम करत असलेल्या कामगार बरोबर रोजा (उपवास) सोडत होता. हे सर्व दृश्य सीसी कॅमेरा मध्ये कैद आहे.वारंवर त्यांचे वडील सांगत होते. सीसी टीव्ही मधील असलेले फोटोज व कम्प्युटर दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दुकानातून घेऊन गेल्याने त्यातील सर्व पुरावे नष्ट केल्याचे आरोप वारंवार त्यांच्या वडिलांनी अनेकदा केले आहे. माझा मुलगा निरपराध आहे कृपया आमच्या परिवाराचा वाटोळे करू नका काहीतरी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत आहे आमचा विश्वास करा  विनंती करून सुद्धा कोणीच त्या वडिलांचा ऐकायला तयार नव्हते शेवटी फिरोज सय्यद यांना अटक करण्यात आली. मुंबई,दिल्ली तिहार जेल, बिहार व आत्ता ते यूपी येथील गाजियाबाद तुरुंगामध्ये बंद आहे.त्या रोजी पासून तर आज पर्यंत मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले वडील अब्दुल हमीद सय्यद यांचे दिनांक 3/10/2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

जंगली महाराज येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचे खरे सूत्रधार फिरोज सय्यद त्यांच्यासोबत अटक केलेले मुख्य आरोपी हेच आहे ? किंवा कुणी दुसरे ? याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आले होते.महाराष्ट्र एटीएस तपास करीत असताना अचानकपणे दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी छडा कसा लावला.
तो दयानंद पाटील त्याच्या जवळील असलेली सायकल मध्ये स्फोटके होती. अचानक पाटील कुठे गायब झाला. स्वतः पाटील यांच्या हातात स्पोर्ट कशी ठेवली होती पोळी झाला स्थानिक लोकांनी दयानंद पाटील यांना पोलिसांच्या ताब्यात दिले स्वतः दयानंद पाटील यामध्ये साक्षीदार कसे झाले. यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
यापूर्वी अटक केलेल्या अनेक लोकांवर तीन तीन चार चार राज्यामध्ये बॉम्बस्फोटाचे गुन्हे दाखल आहे. गेल्या दहा वर्षात कोर्टात ट्रायल सुद्धा  सुरू झाले नाही.चार चार पाच पाच राज्यात जाऊन इतकी मोठी लढाई लढणे कोणालाच शक्य नाही. म्हणून गेल्या दहा वर्षापासून आम्ही सतत बोलत आहोत की 2002 पासून भारतात झालेल्या सर्व बॉम्बस्फोटाचा खटल्यांना सेंट्रलाइज करा एकत्रित करा. सर्व बॉम्बस्फोटाचा फिर तपास करा. बॉम्बस्फोटाच्या खऱ्या सूत्रधारांना अटक करा.मुस्लिम तरुण यामध्ये जर आरोपी असेल तर त्यांना फाशीची शिक्षा द्या. मात्र मुस्लिम तरुणांचा आयुष्याचा वाटोळं करू नका. यापूर्वी अनेक पत्रव्यवहार माननीय प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.केंद्रीय गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांना आम्ही केलेले आहे.मात्र कोणतीच दखल यामध्ये घेतली जात नाही असे आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी केले.

         गरीब कुटुंबाच्या असलेल्या फिरोज सय्यद त्यांचे वडील मेल्यानंतर परिवारचे लोक कशी इतकी मोठी लढाई लढणार फिरोज सय्यद यांना देशातील विविध राज्यामध्ये आरोपी बनविण्यात आले आहे. बॉम्बस्फोटा गटामध्ये मध्ये अटक करण्यात आली आहे. कोण कोणत्या राज्यात जाऊन ते आपल्या मुलाला न्याय मिळवून देतील कशा पद्धतीने त्या त्या राज्यात वकील उपलब्ध करून देतील अनेक समस्या त्यांच्या परिवाराच्या समोर उभे आहे. 
अनेक वर्षापासून कोणतेच पत्रव्यवहार किंवा फोनवरून आपल्या मुलाशी परिवारच्या लोकांना बोलता आले नाही.

         कोरोना या महामारीत आपला मुलगा सुरक्षित आहे किंवा नाही हे सर्व दुःख अब्दुल हमीद सय्यद यांच्या मनात होते.
शेवटी हे सर्व दुःख मनात घेऊन फिरोज सय्यद यांचे वडील त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांचे मागे त्यांची पत्नी,सून,फिरोज सय्यद यांचे 4 मुलं आहेत.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

आपला विश्वासू 

अंजुम इनामदार
अध्यक्ष मूलनिवासी मुस्लीम मंच
9028402814

 

Post a comment

0 Comments