मलगौंडा पाटील यांची पुन्हा संचालक पदी एक मतांनी निवड


  

बेडकिहाळ क्रुषी पत्तीन सहकारी संघा मध्ये मल्लगौंडा पाटील यांची पुन्हा संचालक पदी एकमताने निवडPRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ : विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी. 

   बेडकिहाळ येथील प्राथमिक क्रुषी पत्तीन सहकारी संघाच्या नुतन संचालक पदी मल्लगौंडा पाटील यांची बिनविरोध पुन्हा निवड झाल्याबद्दल बेडकिहाळ मध्ये त्यांच्या समर्थकांकडुन फटाक्यांच्या आतीषबाजीने बेडकिहाळ ग्राम दनानुन सोडले.  
    मल्लगौंडा पाटील हे आण्णासाहेब जोल्ले व सौ. शशिकला जोल्ले यांचे निकटवर्तीय असल्याने तसेच बी.जे.पी.पक्षाचे प्रमुख सुध्दा आहेत.  पाटील यांची क्रुषी पत्तीन मध्ये याच्या अगोदर सुध्दा संचालक पदी निवड झाली होती.  सामाजिक कार्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.  सर्व सामान्यांना ते आपलेसे वाटतात.  बेळगाव च्या डी.सी.सी बॅंकेने नवीन संचालक पदी निवड केल्याबद्दल त्यांचा कार्यर्कत्यांमध्ये व बेडकिहाळ गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.   संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे परत त्यांची निवड करुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे उत्साह वाढवला आहे.   शेतकरी वर्ग सुध्दा त्यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. निवड झाल्याबद्दल बेडकिहाळ व परिसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post